Mahanews
बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०
फर्स्ट पर्सन
वर्षा पर्यटनासाठी साद घालतोय गगनबावडा .. .
तर मग आपणही ही मजा चाखण्यासाठी गगनबावडय़ाला या... तो आपणाला साद घालत आहे.
दिलखुलास
जय महाराष्ट्र
अनधिकृत शिक्षणसंस्था चालकांना दंड आणि शिक्षा -राजेश टोपे
अनधिकृत शिक्षणसंस्थेद्वारे होणारी विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अनधिकृत संस्था प्रतिबंध कायदा तयार केला असून हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे.
लोकराज्य



अल्पसंख्याक विद्यार्थी आयटीआय इमारतीच्या बांधकामाला लवकरच प्रारंभ - नसीम खान
सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०

अल्पसंख्याक मुला-मुलींना उद्योग विषयक प्रशिक्षण मिळावे यासाठी मुंबई शहरात सुरु करण्यात येणार्‍या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) इमारतीचे बांधकाम दोन महिन्यात सुरु करण्यात येईल, असे प्रतिपादन अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरीफ नसीम खान यांनी केले.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मुंबई शहर व मुंबई उपनगरासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे दोन नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरु करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. या अनुषंगाने मुंबई शहरात डोंगरी भागात आयटीआय संस्थेसाठी भूखंड शासनाच्या ताब्यात घेण्याचा कार्यक्रम सोमवारी श्री. खान यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी खासदार मिलींद देवरा, स्थानिक आमदार तसेच मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमिन पटेल, नगरसेवक श्री. अन्सारी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक आर.सी. बाळापुरे, मुंबई विभागाचे सहसंचालक डी. ए. दळवी उपस्थित होते.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आय.टी.आय. सुरु करण्याकरीता भूखंड ताब्यात मिळाल्याने अतिशय आनंद होत आहे, असे सांगून श्री. खान म्हणाले, नवीन आयटीआय सुरु करण्यासाठी शासनाने १७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या भूखंडावर आयटीआय प्रशिक्षण संस्थेची इमारत सुरु करण्यासाठी सर्व आराखडे तयार करावेत, तसेच स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी एक हॉल बांधण्याच्या दृष्टीने आराखडा तात्काळ तयार करुन घ्यावा, अशा सुचनाही श्री. खान यांनी दिल्या.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना आयएएस सेवेत जाता यावे यासाठी राज्यातील आयएएस ट्रेनिंग केंद्रात प्रत्येकी १० जागा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी वाढविण्यात येणार असून त्यामध्ये ४० विद्यार्थ्यांना आयएएस परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचा खर्च अल्पसंख्याक विकास विभागाद्वारे करण्यात येईल, असेही श्री. खान यांनी यावेळी बोलताना सांगितले.

आयटीआय संस्थेच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन लवकर करुन काम सुरु करावे, अशा सूचना देऊन, आवश्यकता भासल्यास आर्थिक मदतही करण्यात येईल, असे आश्वासन खासदार मिलींद देवरा यांनी यावेळी केले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी ताब्यात घेण्यात आलेला भूखंड हजरत अ. रहेमान शाह बाबा दर्ग्याच्या बाजूला असून तो ८८०.४३ चौ.मीटर इतक्या क्षेत्रफळाचा आहे.

हजरत अ.रहेमान शाह बाबा दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल रहमान टिनवाला, सदस्य अनिस काश्मिरी तसेच स्थानिक नागरीक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
ई बातमी
Copyright DGIPR and Government of Maharashtra About Us  |  Team  |  Contact us  |  Feedback  |  Terms of use |  Hacking Notification
Site is best viewed with IE 6.0 or higher and min. screen resolution of 1024x768 Developed by OneUpDesigns
A Yass Multimedia Project
Total visits : 3219709